मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण
शिरसोली (वार्ताहर) : पंचायत समिती, शिक्षण विभाग, जळगाव व बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५ चे आयोजन बुधवारी करण्यात आले. यात विद्यार्थ्यांची सुमारे १४४ उपकरणे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते. त्याचप्रमाणे १६ शिक्षकांचे व ०२ प्रयोग प्रयोगशाळा सहाय्यक परिचारांचे होते.
सदर तालुकास्तरीय प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक अस्वार हे होते. तर प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समितीचे सरला पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप बारी, संस्थेचे सचिव सुरेश अस्वार, संचालक निलेश खलसे, यादवराव बारी, रघुनाथ फुसे, अर्जुन काटोले, माजी सरपंच रामकृष्ण काटोले, पत्रकार विलास बारी, शालिग्राम पवार, पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, खलील शेख, जितेंद्र चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक अस्वार, यांनी फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख दीपक कुलकर्णी व चंद्रकांत कुमावत यांनी केले. आभार केंद्र प्रमुख सुशील पवार यांनी मानले. त्यानंतर समारोपच्या व बक्षीस वितरणाच्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
बक्षीस वितरणाप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सरला पाटील, विजय पवार, खलील शेख, शिक्षिका योगिता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सदर प्रदर्शनाचे परीक्षण गोपाल महाजन, भरत बारी, एस . बी .कुलकर्णी, योगिता पाटील, रडे सर, राणे सर आदींनी केले. या वर्षाच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गटात अनुष्का किरण मराठे, आर .आर .विद्यालय जळगाव, द्वितीय मारिया रहीम शेख प्रगती माध्यमिक विद्यालय, जळगाव, तृतीय अरहम असलम पठाण, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम : सागर विजय अस्वार, बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, शिरसोली, द्वितीय हर्षल शशिकांत पाटील, महात्मा गांधी विद्यालय, भादली, शिव सुरेश कुमावत, बहिणाबाई माध्यमिक विद्यालय, जळगाव शिक्षक शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गट प्रथम योगिता ममराज पवार, जि प प्राथमीक शाळा, वावडदा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गट प्रथम अनिता राजेश शिरसाठ, प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गट प्रथम ऋषिकेश विजय पाटील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, जळगाव त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
सदर प्रदर्शन साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर, सर्वेक्षक सुरेखा दुबे, ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील, सुनील भदाणे, अशोक बावस्कर, संजय काटोले, सुनील ताडे, विज्ञान शिक्षिका देवका पाटील, आकांक्षा निकम, किरण कोळी मनीषा बारी, मनीषा पायधन, आशा कोळी, रंजना बारी, घनश्याम काळे, प्रयोगशाळा सहाय्यक गोपाल बारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.