मुख्यमंत्र्यांची माहिती ; स्पीडबोटीत बिघाड झाल्याने घडली घटना
मुंबई (प्रतिनिधी) :- मुंबई गेट वे इंडियावरुन एलिफंटा गुहांच्या दिशेने प्रवास करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटाने दिलेल्या भीषण धडकेत १० नागरिक व ३ नौदल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २ गंभीर आहे. एकूण १०१ लोकांना बाहेर काढण्यात आले असून काही बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.
सध्या संरक्षण दलांकडून रेक्स्यू ऑपरेशन सुरु आहे. दोन रेक्स्यू टिमकडून हे बचावकार्य सुरु आहे. समुद्राच्या बाजूने असणाऱ्या नाविकांची मदत पोलिसांनी घेतली आहे. नौदल, पोस्टगार्ड, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधकार्य सुरु करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, उरण, कारंजाजवळ ‘नीलकमल’ ही बोट गेट वे इंडियावरुन एलिफंटा गुहांच्या दिशेने जात होती. तेव्हा समुद्रात नौदलाच्या स्पीडबोटीने मागून धडक दिली. त्यात १३ जण मृत्युमुखी पडले. काहीजण बेपत्ता झाले आहे. एकूण १०१ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नौदल, तटरक्षक दल, यलोगेट पोलिस स्टेशन आणि स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
नीलकमल बोटीचे मालक राजेंद्र पाटणे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. बोट हि एकूण ८० प्रवासी घेऊन गेली होती. त्या बोटीला नौदलाच्या स्पीडबोटने जोरात धडक दिल्याची माहिती दिली असून त्याचा विडिओ देखील व्हायरल होत आहे. हि घटना दुपारी सव्वा तीन वाजता घडली. बोटीत लाईफ जॅकेट आहेत, अशीही माहिती पाटणे यांनी दिली आहे. दरम्यान, खान्देशातील काही नागरिक हे बोटीत असल्याची माहिती मिळाली आहे.
तर दुसरीकडे, अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, बचावकार्य वेगात सुरु असल्याची माहिती दिली. नौदलाकडून परीक्षण सुरु असताना स्पीडबोटीचा ताबा सुटला अन ती बोट ‘नीलकमल’ बोटीवर जाऊन धडकली. मृत व्यक्तींच्या परिवाराला शासनाकडून ५ लाख रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.