जळगाव ( प्रतिनिधी) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सन 2020-2021 मध्ये सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी तसेच कंपोस्ट खत निर्मितीसाठी नॅडपे, गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ खत उत्पादन युनिट, विहिर पुर्नभरण, शेततळे इत्यादी घटकांचा लाभ घेणेसाठी गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक यांचेशी संपर्क साधून त्यांचे योग्य ते मार्गदर्शन घ्यावे, तसेच अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.








