पाचोरा ( प्रतिनिधी) – भड़गांव कापूस उत्पादक शेतकरी यांचा कापूस मोजण्यात यावा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणी ची सहकार व पणन मंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे याना भड़गांव व नगरदेवळा येथे तातडीने पणन महासंघाचे ग्रेडर उपलब्ध करुन देण्याचे आदेश आज रोजि दिले असून भड़गांव व नगरदेवळा येथील कापूस खरेदी केन्द्र सुरु करण्यात यावेत म्हणून मा. आमदार दिलिपभाऊ वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन मागणी केली होती तसेच त्यांच्या मागणीचे निवेदन मा. संजय नाना वाघ पाचोरा भड़गांव विधानसभा प्रमुख नितिन दादा तावडे बाजारसमिति उपसभापति अँड विश्वासराव भोसले. रा. का पार्टी. तालुका अध्यक्ष विजय आप्पा पाटील.नगरसेवक रणजीत पाटील. भड़गांव तालुका अध्यक्ष सन्तोष जाधव. डॉ अमृत पाटील. शरद पाटील.भोला अप्पा चौधरी खालीलदादा देशमुख आदिनी प्रान्त अधिकारीश्री राजेन्द्र कचरे याना दिले होते.आज राष्टवादि कांग्रेस पार्टी चे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले अँड विश्वासराव भोसले यांचे सुद्धा दूरध्वनी वरुण सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी या बाबत बोलणे झाले असता ना. पाटील यांनी भड़गांव येथील जयभवानी शकर जिनिंग व नगरदेवळा येथील वैश्वनवी जिनिंग येथे ग्रेडर ची नेमणूक करून ताबडतोब भड़गांव व नगरदेवळा येथील जिनिंग सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिलेत या मंत्री मोहदय यांचे आदेशाने भड़गांव व नगरदेवळा परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा प्रश्न सुटन्यास मदत होणार आहे.








