सावदा पोलीस स्टेशनची कारवाई
शुक्रवार दि.१३ डिसेंबरला दुपारी २ वाजेच्या सुमारास सावदा पोलिसांनी शहरातील ख्वाजा नगर मधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना बनावट चलनी नोटा बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. त्यांनी भुसावळ येथील आवेश नामक व्यक्ती कडून ४ हजार रुपयांना १० हजारांच्या बनावट नोटा विकत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले. मात्र आवेश फरार असल्याने त्याने त्या बनावट चलनी नोटा कुठून आणल्या या बाबत खुलासा होत नव्हता.
सावदा पोलिसांनी सापळा रचून आवेशला भुसावळ येथून शिताफीने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.