मयताच्या भावाला साडेपाच महिन्यात मिळाला न्याय
जळगाव (प्रतिनिधी) :- पश्चिम बंगाल येथिल व्यक्तीचा गोवा येथे झालेल्या अपघातात जळगांव न्यायालयाने लोकअदालतमध्ये शनिवारी २२ लाख ५० हजार रूपयेची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मुळ जलपाईगुडी, पश्चिम बंगाल राज्य येथिल रहीवासी आशिष शहा अमन शहा हे ताज हॉटेल, गोवा येथे कायमस्वरूपी नोकरीला होते. दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचा कोलवा (गोवा) पोलिस स्टेशन हद्दीत रस्ता अपघातात मृत्यु झाला होता. अपघातावेळी ते त्यांच्या स्कुटीने कामावरून घरी जात होते, त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक पासींगची इनोव्हा गाडीने त्यांना जोरदार धडक दिली व त्यांचा जागीच मृत्यु झाला. सदर अपघाताबाबत कोलावा पोलिस स्टेशन येथे अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली.
तसेच मयताचे भाऊ हे बंधन बँकेत नोकरीनिमीत्त जळगांव येथे राहत असल्याने त्यांनी जळगांव येथिल मोटर अपघात दावा प्राधिकरण येथे त्यांच्या भावाच्या अपघाती निधनाबाबत नुकसान भरपाई रक्कम मिळणेकामी अँड. महेंद्र सोमा चौधरी यांचे मार्फत जळगांव येथे दावा दाखल केला. सदरचा अपघात हा सामनेवाला इनोव्हा वाहन (कं KA-22- MB-0716) चालक रघुवेंद्र परशुराम साळुंके व मालक अनिल हनुमंतराव घोरपडे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याने व त्यांची वाहन आय.सी.आय.सी.आय लंबोर्ड जनरल इंशुरन्स कंपनी यांच्याकडुन विमाकृत असल्याने तीघाविरूध्द नुकसान भरपाई दावा दाखल करण्यात आला.
वाहन चालक व मालक यांच्यातर्फे अँड. सुनिल तुकाराम चव्हाण यांनी म्हणने मांडले की, अपघात झाला असुन अपघातावेळी गाडीचा विमा वैध असल्याने नुकसान भरपाई रक्कम ही विमा कंपनीकडुन वसुल करण्यात यावी असा आदेश केला. विमा कंपनीने प्रथम दर्शनीय सदर प्रकरणाची चौकशी केली व लोकन्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या वकीलांची चौकशी करून चर्चेअंती २२ लाख ५० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा ठराव लोकन्यायालयाच्या समक्ष पारीत केला.
विशेष बाब म्हणजे घटना ही गोवा येथे दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली होती. सदर प्रकरण मोटार अपघात दावा प्राधिकरण दिनांक ६ मे २०२४ रोजी दाखल करण्यात आले व सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा हा केवळ साडेपाच महीन्यात झाला. यासाठी स्वतः अर्जदारांनी लोकन्यायालयाच्या पॅनलचे आभार मानले. लोकन्यायालयाच्या अधिकृत पॅनलचे अध्यक्ष न्यायमूर्ती बी. एस. वावरे यांनी योग्य ते आदेश पारित करत नुकसान भरपाईची रक्कम पक्षकाराला स्वाधीन केली. सदर प्रकरणात अर्जदारातर्फे अँड. महेंद्र सोमा चौधरी, अँड.श्रेयस महेंद्र चौधरी अँड. हेमंत रामदास जाधव यांनी कामकाज पाहीले.
धनादेश देताना प्रमूख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम क्यू एस एम शेख, जिल्हा न्यायाधीश व लोक न्यायालय पैनल प्रमुख बी. एस. वावरे, जिल्हा सरकारी वकील एस. जी. काबरा, जळगाव जिल्हा वकील संघ अध्यक्ष अँड. रमाकांत पाटील , जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायाधीश सय्यद शेख,अर्जदार तर्फे अँड. महेंद्र सोमा चौधरी व अँड. श्रेयस महेंद्र चौधरी.