जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पोटाच्या आजाराला कंटाळून ५४ वर्षीय प्रौढाने दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दिनांक १० रोजी भादली बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
लिलाधर गोविंद खडसे असे मृताचे नाव आहे. लिलाधर खडसे हे अनेक महिन्यांपासून पोटाच्या आजारापासून त्रस्त झाले होते. मंगळवारी घरात कुणी नसताना त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. हा प्रकार त्यांच्या चुलत भावाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ खडसे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करीत आहेत.