अमळनेर शहरातील सुंदर नगर परिसरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- नातेवाइकांच्या अंत्ययात्रेला गेलेल्या सैनिकाच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दोन लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना दि. ६ ते ९ डिसेंबरदरम्यान पिंपळे रस्त्यावर घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
उदय हिंमत पाटील (रा. सुंदरनगर, पिंपळे रस्ता) यांच्या काकूंचे निधन झाले. त्यानंतर ते दि. ६ रोजी घराला कुलूप लावून अमळगाव येथे गेले होते. दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता घरी परतले. त्यावेळी चोरी झाल्याचे समोर आले. यात १ लाख रुपये रोख, १ लाखांची सोन्याची पोत, दोन हजारांचे चांदीचे ब्रेसलेट चोरीला गेले. उदय पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.