पत्रकाराचा कॅमेरा हिसकवल्याप्रकरणी जळगाव शहर स्टेशनला तक्रार दाखल
जळगांव (प्रतिनिधी) : –येथील पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करणे याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी महानगरपालिकेच्या नगररचना सहायकला लाच घेताना अटक करण्यात आले आहे तर पाईपलाईन चोरी प्रकरण देखील गाजत आहे.
पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले. काही एक कारण नसताना त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला. तो एका कर्मचाऱ्याजवळ दिला आणि त्यातील मेमरी कार्ड काढून दमदाटी केली. त्यानंतर विक्रम कापडणे हे महानगरपालिकेतून निघून जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले. त्यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्याविरोधात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.
विक्रम कापडणे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला. यावेळी घटना घडताना साक्षीदार म्हणून भांडारपाल आणि मनपातील काही कर्मचारी तेथे उपस्थित होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता यांनी याप्रकरणात सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना विचारणा केली. सर्व कायदेशीर बाबी सांगितल्या तेव्हा कॅमेरा कापडणे यांना परत करण्यात आला.
सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना इतका पुडका आहे.महानरपालीकेचा तर त्यांनी इतर बाबींवर लक्ष द्यावे जेणे करून मनपाचे नाव बदनाम नाही होणार आता सध्या मनपा चे नविन कारनामे बाहेर येत आहे. अशी चर्चा जळगाव शहरात सुरू आहे.