रेल्वे बोर्डातर्फे प्रबंधक इती पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपक्रम
भुसावळ (प्रतिनिधी) :- रेल्वे बोर्ड आणि मुख्यालयाच्या निर्देशानुसार, आज दि. ९ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात “महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध सप्ताह” साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मंडल रेल्वे प्रबंधक इती पांडे यांच्या अध्यक्षतेखाली मंडल कार्यालयातील सभागृहात एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत आंतरशिकायत समितीच्या अध्यक्षा विलीना मेटापल्ली, वरिष्ठ मंडल वैद्यकीय अधिकारी, भुसावळ आणि समितीचे सदस्य विजय खैची, वरिष्ठ मंडल संकेत व दूरसंचार अधिकारी, भुसावळ हे उपस्थित होते. कार्यशाळेची प्रस्तावना एन.एस. काझी, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी यांनी केली. या कार्यशाळेमध्ये विभागातील विविध शाखांतील महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यशाळेचे संचालन वीरेंद्र वडनेरे, सहायक कार्मिक अधिकारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतुल कुमार रायकवार, सहायक कार्मिक अधिकारी यांनी केले. रेल्वे प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम महिलांच्या सुरक्षितता आणि कार्यस्थळी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.