पियुष हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ जळगांव वेस्टचे आयोजन
जळगाव : – येथील पियुष हॉस्पिटल, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान व मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर दि. ४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
डॉ. रोहन पाटील यांचे पियुष हॉस्पिटल, जळगाव येथे शिबिर झाले. रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करावे हे ब्रीदवाक्य मानून रक्तदान व मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. रोटरी क्लब ॲाफ जळगाव वेस्टचे सदस्य, मराठा प्रीमियर लीगचे सदस्य व इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या उस्फुर्तपणे रक्तदान केले.
या शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान केले व ७५ जणांची मोफत नेत्ररोग तपासणी करण्यात आली. याप्रसंगी पियुष हॉस्पिटल चे संचालक डॉ. रोहन पाटील, अशोक पाटील, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजेश पाटील, अध्यक्ष विनीत जोशी, सचिव भद्रेश शाह, राहुल मोदीयानी तसेच मराठा प्रीमियर लीगचे सदस्य प्रफुल पाटील , सागर पाटील, राहुल परकाळे, विवेक पाटील, राकेश गावंडे, ज्ञानेश्वर पाटील व इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य इत्यादी उपस्थित होते. या उपक्रमात पियुष हॉस्पिटल,जळगावचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.