शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावरील घटना
शिरपूर (प्रतिनिधी) :- शहरातील करवंद रस्त्यावर जैन उद्यानात सुरु असलेल्या महाशिवपुराण कथेमध्ये लाखो भाविकांची उपस्थिती लाभली आहे. या गर्दीत चोरटयांनी त्यांचा उच्छाद मांडला असून आतापर्यंत दागिने, रोकड, दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
गेल्या ४ दिवसात १६ भाविकांचे ३३४ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिन्यांसह २० हजार ५०० रुपये रोख यासह १ दुचाकी चोरीला गेली आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा हि दि. १ ते ७ डिसेंबर दरम्यान दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान आहे. त्यामुळे गेल्या ५ दिवसांपासूनच भाविक कथास्थळी मुक्कामी थांबले आहेत.