चार महिला जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
शिरपूर (प्रतिनिधी) :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरु असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा ऐकण्यास जात असलेल्या भाविकांच्या रिक्षेला अपघात झाला. या अपघातात चार महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिरपूर शहरात करवंद रस्त्यावर पंडित मिश्रा यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या कथेसाठी शिरपूर शहरात येत असलेल्या भाविकांच्या एका २७९८ क्रमांकाच्या रिक्षेला शिंदावी गावाजवळ पुढचे टायर फुटून वाहन अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला. (केसीएन) रिक्षा थेट शेतात जाऊन उलटली. यात ४ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरु आहेत. पोलीस घटनेची माहिती घेत आहेत.