यावल तालुक्यातील कोरपावली येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरपावली येथील तरुणाने त्याच्या राहत्या घरात छताला लावलेल्या पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतनकुमार एकनाथ महाजन (वय ३६ वर्षे, रा. कोरपावली ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. चेतन कुमार यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. घरात कोणी नसताना त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. आजूबाजूच्या लोकांच्या साह्याने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तरुणाचे वडील एकनाथ दिगंबर महाजन यांच्या खबरवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीआय प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित तडवी पुढील तपास करीत आहेत.