आ. किशोर पाटील यांनी केले काटा पूजन
भडगाव (प्रतिनिधी) :- येथे किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत संघाच्या पाचोरा रस्त्यावरील कार्यालयात भडगाव येथे दि. २८ गुरुवार रोजी खरेदी केंद्राचे उदघाटन आ. किशोर पाटील व संघाचे अध्यक्ष पुंडलिक पाटील यांच्या हस्ते काटा पुजन करून करण्यात आले.
यावेळी प्रथम शेतकरी नाना ईश्वर पाटील यांचा सत्कार आ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नवनिर्वाचीत आमदार किशोर पाटील यांचा सत्कार शेतकरी संघाचे अध्यक्ष पुंडलिक पाटील यांनी केला. तसेच युवराज रामसिंग पाटील यांचा सत्कार संघाचे संचालक अमोल सुरेश पाटील यांनी केला. यावेळी संघाचे संचालक खुमानसिंग हिलाल पाटील, रायचंद शामिसंग परदेशी, गुलाब हिलाल पाटील, अमोल सुरेश पाटील, भीमराव ओंकार पाटील, गोविंद एकनाथ माळी, संघाचे माजी प्रेसिडेंट नगराज जुलाल पाटील, अजीत पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील, डी. डी. पाटील, सुरेश पाटील, ग्रेडर दिलीप नरवाडे, साहेबराव पाटील, विशाल भोई, शेतकरी, विठ्ठल पाटील, धर्मराज निकम, सुभाष पाटील, दिगंबर पाटील, शैलेश पाटील, सुनील पवार, रमजान पिंजारी, हमाल पिरन कोळी, अमजद पठाण, रौफ शेख व शेतकरी बांधव उपस्थित होते.
भडगाव शेतकरी सहकारी संघात सोयाबीनसाठी १६८ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. सोयाबीनसाठी ४८९२ रुपये हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे. तसेच दि. १५ डिसेंबरपर्यत सोयबीन नोंदणी सुरु आहे. तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना खरेदीबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.