पाचोरा पोलीस स्टेशन येथे घडली घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- येथील जारगाव चौफुली येथे दोन जणांचा खून झाल्याची खोटी माहिती ११२ डायल क्रमांकावर खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची व पोलिसांची दिशाभूल करणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनला रविवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजुन २५ मिनिटांनी डायल ११२ वर अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की, पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे. (केसीएन)त्यापैकी २ लोकांचा मर्डर झालेला आहे. त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे. तात्काळ पोलीस पाठवा बाबत फोन आलेला होता.
सदर माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचा स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सखोल चौकशी केली.(केसीएन)मात्र फोन आल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती. फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरुन शोध घेतला असता शैलेश रविंन्द्र पाटील (रा.तामसवाडी ता. पारोळा, हल्ली मु.रा. जारगाव चौफुली, पाचोरा) हा मिळून आला.
त्यास घटनेबाबत विचारपुस करता त्याने कळवले की, मी मुददामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला होता. तशी काही एक घटना घडलेली नाही. शैलेश रविंन्द्र पाटील याने नागरीकांना व पोलीसांना त्रास व्हावा या हेतुने मुददामहून पोलीसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे.