अमोल शिंदे २६ हजार मतांनी पिछाडीवर
जळगाव (प्रतिनिधी) : येथील पाचोरा विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर किशोर पाटील यांनी सुमारे ६५ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे अपक्ष अमोल शिंदे हे पिछाडीवर आहे.
किशोर पाटील यांना ६५ हजार ८८५ आणि अपक्ष अमोल शिंदे यांना ३८ हजार ९२७ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे वैशाली सूर्यवंशी ३४ हजार ४२३ मते मिळाली आहे. प्रताप हरी पाटील यांना ४२४२, दिलीप वाघ २५४२ मते मिळाली आहे. आतापर्यंत १७ फेऱ्या संपल्या असून अजून ९ फेरी बाकी आहे.