जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना दुसऱ्या फेरी अखेर २४०३६ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी ११ हजार ८५९ मध्ये घेतली आहेत. त्यामुळे सध्या १३ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे १५०८, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले ६६७, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना ४५२, कुलभूषण पाटील ३३४, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना २४७ मध्ये मिळाले आहेत.