जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कार चालक घरी जात असतांना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ही घटना दि. २० रोजी सायंकाळच्या सुमारास जुडीओ शोरुम समोर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सम्राट कॉलनीतील ग्यानचंद गोविंदराम चंदाणी हे (एमएच ४८, पी ७३८७) क्रमांकाच्या कारने घरी जात असतांना राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या (जीजे १९, वाय ९१३३) क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले असून चंदाणी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.
त्यानुसार ट्रक चालक सुरजसिंग शिवकुमारसिंग (रा. अॅलीपर्सोली रा. गोन्डा उत्तरप्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार हे करीत आहे.