यावल तालुक्यातील दगडी मनवेल येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : एका मतदाराने पैशांच्या प्रलोभनाला बळी पडून मतदानाच्या हक्कावर गदा आणली म्हणून त्याचेविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांच्याकडे भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार सुनील तुकाराम भिल्ल यांनी एक व्हिडिओ पाठवला होता. त्यानुसार पाटोळे यांनी खात्री करण्यासाठी एक पथक निर्माण करून ते मनवेल गावाला पाठवले. (केसीएन)तेथे पथकाने पोलीस पाटलांशी संपर्क करून व्हिडिओ दाखवत त्यातील इसमांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यात एका व्यक्तीचे नाव जितेंद्र भिका कोळी असल्याचे दिसून आले.
जितेंद्र भिका कोळी (रा. दगडी मनवेल) याला पैसे घेण्यास प्रवृत्त करून मतदानाचा हक्क वापरण्याबद्दल पैसे देताना हा व्हिडिओ होता. तसेच जितेंद्र कोळी यांनी मतदानाचा हक्क वापरण्याबाबत रोख रक्कम स्वीकारून स्वतःच्या मतदानाच्या हक्कावर गदा आणल्याचे व्हिडिओ दिसून आले. त्यामुळे शासकीय पथकातील कृषी पर्यवेक्षक नरेंद्र धोंडू जाधव यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी दि. १९ रोजी मध्यरात्री जितेंद्र कोळी आणि दोघे पैसे देणारे अनोळखी ईसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.