काही ठिकाणी नागरिक अजूनही रांगेतच, प्रशासनाची तारांबळ
जळगांव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५४.६९% मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रतिसाद संमिश्र दिसून आला असून, काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात मतदान झाले, तर काही ठिकाणी मतदान कमी प्रमाणात झालेले दिसले.
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८ मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मुख्यतः लढत होत आहे.
मतदार संघनिहाय टक्केवारी
अमळनेर -55.10%
भुसावळ -52.44%
चाळीसगाव -56.05%
चोपडा -52.13%
एरंडोल- 58.36%
जळगाव सिटी- 45.11%
जळगाव ग्रामीण -60.77%
जामनेर -57.34%
मुक्ताईनगर- 59.69%
पाचोरा -46.10%
रावेर – 62.50 %