जळगाव ;- सध्या कोरोनाचे थैमान देशात सुरु असून विरोधकांनी या काळात राजकारण करू नये , कोरोनानंतर त्यांनी मैदानात उतरून सरकार पाडून दाखवावे असे आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि , आज आपण कोरोनाग्रस्तांची काय पुढाकार घेतला हे दाखवून द्यावे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारले आहे . यांचे कार्य चांगले आहे , तसेच अजित पवार हे जनतेच्या पक्के मनात बसले आहे . सरकार पाडण्याचे घाण पद्धतीने केलेले राजकारण आहे. पाण्यात राहणारा मासा ज्या प्रमाणे बाहेर आल्यानंतर तडफडतो तसेच विरोधकही सत्तेबाहेर असल्याने तडफडताहेत अशी टीकाही केली . महाराष्ट्राच्या सरकारला सल्ला देण्यापेक्षा गुजरातच्या सरकारला सल्ला द्यावा असा टोलाही पालकमंत्री यांनी लगावला . कोरोनाचे संकट असतानाही अधिकारी आणि पुढारी यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करीत असून कोरोनानंतर मैदानात या असे आव्हान ना. गुलाबराव पाटील यांनी केले .