जळगाव — गोदावरी फाउंडेशन संचलीत डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन महाविद्यालयात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलिमा वारके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..
डॉ.वारके यांनी मार्गदर्शन करताना नेहरूंच्या नेतृत्वाखाली अनेक उच्च शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या आहेत. यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. मुलांच्या आणि त्यांच्या मातांच्या कल्याणासाठी पंडित नेहरूंनी नेहमीच प्रयत्न केले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.नीलिमा वारके यांनी नेहरूंच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांची आपल्या जीवनात अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.