जामनेर तालुक्यातील लोहारा येथे महाविकास आघाडीचे नियोजन
जामनेर (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप बळीराम खोडपे सर यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे आणि जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांची जाहीर सभा आज दि. १६ नोव्हेंबर रोजी लोहारा येथील बस स्टॅन्ड परिसरात संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.
जामनेर विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे जोरात वाहत असून यंदा उलटफेर होण्याची मोठी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे दिलीप बळीराम खोडपे सर यांच्या प्रचाराने आता गावोगावी जोर धरला आहे. प्रचारामध्ये कार्यकर्त्यांसह आता ग्रामस्थ देखील सहभागी होत आहे. दिलीप खोडपे सर यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत आमदार रोहित पवार यांची शेंदुर्णी व आमदार एकनाथराव खडसे यांची पहूर येथे,तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची जामनेर येथे सभा झालेली आहे. आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मतदार संघात रोड शो केला होता.
आज लोहारा येथील बस स्टँड परिसरात दि. १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेमध्ये महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडी करुन करण्यात आले आहे.