पारोळा (प्रतिनिधी) : एरंडोल-पारोळा विधानसभेसाठी शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचार रॅलीला ग्रामीण भागातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. अमोल पाटील यांनी विकास कामांचे व्हीजन समोर ठेवून निवडून आल्यानंतर काय कामे केली जातील याची माहिती दिली. तसेच गेल्या अडीच वर्षात आमदार चिमणराव पाटील यांनी केलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी मतदार संघातील गावांमध्ये जावून नागरीकांशी संवाद साधल्याचे दिसून आले.
महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांच्या प्रचाराने दिवसेंदिवस आघाडी घेतली आहे. सर्व वयोगटातील नागरिकांच्या मनात अमोल चिमणराव पाटील हे लोकप्रिय उमेदवार झाले आहेत. एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासाठी मेहनत घेत आहे. विविध गावागावात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे मतदारसंघात स्वागत होत असून महायुतीसाठी चैतन्याचे वातावरण पसरले आहे.