चोपडा तालुक्यातील गलंगी येथे कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील गलंगी गावाच्या पोलिस चौकीजवळ रविवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास एका कारमध्ये ५ किलो ३३५ ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन जाताना चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. हा गांजा १ लाख ०८ हजार ७०० रुपये किमतीचा आहे.

मोहम्मद खान सरताज अली खान (३४), तन्वीर मदनकुमार तन्वीर माधव (२०, हैदराबाद), अमर हरदास पावरा (२९, खाऱ्यापाडाव) व अजय वनसिंग पावरा (२३, महादेव दोदवाडा, ता. शिरपूर) हे कारमध्ये गांजाची वाहतूक करीत असताना आढळून आले. त्यांच्या ताब्यात १ लाख ०८ हजार ७०० रुपये किमतीचा ५ किलो ३३५ ग्रॅम वजनाचा गांजा, ४० हजार रुपये किमतीचे चार मोबाइल व ५ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण ६ लाख ४८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोकों वैभव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून चारही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि शेषराव नितनवरे करीत आहेत.









