जळगाव प्रतिनिधी
येथील ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या १९८९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा ९ व १० नोव्हेंबर असा २ दिवसीय स्नेहमेळावा येथील अथांग फार्म हाऊस या निसर्गरम्य परिसरात तब्बल ३५ वर्षांनी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला ५० माजी विद्यार्थी उपस्थित होते.
काही डॉक्टर, वकील, उद्योजक आहेत. काही नोकरीला तर काही आदर्श शेती व्यवसाय करतात. गुरुजनांनी शिकवलेले संस्कारांचे धडे, मित्रांनी केलेले विनोद,शाळेच्या संस्कारांनी आताच्या जीवनात झालेले बदल, शिक्षकांच्या ज्ञानाची शिदोरीचे फायदे, त्यावेळचे मजेदार किस्से, रुसवे फुगवे व्यक्त करत प्रत्येकाने जुन्या आठवणींच्या त्या परमोच्च क्षणांना उजाळा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हरवलेला जुना मित्र परिवार एकत्र करणे आणि त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झालेले मित्रगणांना एकत्रित आणून एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांना मदत व्हावी, हा होता. ‘ गेले ते दिवस आणि राहिल्या’ अशा प्रेमळ भावना सर्वांनी व्यक्त केल्या.या प्रसंगी कविता सिंगतकर व मिलिंद नारखेडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आयोजकांनी सर्वांचे आभार मानुन, अनिरुध्द कुळकर्णी व हंसराज पाटील यांना श्रध्दांजली वाहून स्नेहमिलनाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
जळगावच्या मित्रमंडळींनी अथक परिश्रम घेतले.
या प्रसंगी डॉ जगदिश बोरोले, डॉ. ललित पाटील, डॉ.अभय जावळे, डॉ. प्रशांत महाजन डॉ. प्रसाद देशपांडे अँड. रमाकांत सोनवणे, योगेश पाटील, राहुल अग्रवाल, जिंतेद्र कोल्हे, नितीन सपके, नितीन पाटील, दिनेश पाटील, ऋषिकेश कंरजे, कांचन पाटील, अजय पाटील, हरबक्ष भागवाणी, सुधिर पाटील, कैलास चौधरी, प्रसाद जोशी, डॉ अभय भावे, अविनाश नाईक, प्रशांत कुळकर्णी, शैलेश पाटील, तुषार दीक्षित, जगदिश पाटील, धर्मेंद्र चंदनकर, पुनेश बारी, राजेंद्र विधाते, राजेश फराटे, तुषार नेमाडे, राजेश बाउस्कर, किरण लुल्ले, रुपेश जगताप, राजेश कुलकर्णी, हेमंत पाटील, आनंद साळी, सुनील पाटील, रवींद्र जावळे, निलचंद्र भावसार, तुषार वैद्य, गजेंद्र निमजे, निमित कोठारी, सोमनाथ जोशी, उदय भावसार, वैशाली वाणी व नीता बक्षी उपस्थित होते.