सातारा (वृत्तसंस्था) – मुंबईवरुन प्रवास करुन आलेला माण तालुक्यातील ६२ वर्षीय मृत्यूपश्चात करोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे मंगळवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनमुळे एकूण मृत्यूचा आकडा १२ झाला आहे.
मंगळवारी सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार वाई तालुक्यातील आसले येथील मुंबईवरून आलेला मधुमेह असलेला ६७ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचे निधन झाले आहे आणि जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील ७० वर्षीय बाधित महिलेचाही मृत्यू झाला आहे.