जळगाव ;- शहरातील राजकमल चौक येथील भंगाळे गोल्ड शेजारील गल्लीमध्ये ४० ते ५० लोकांच्या जमावाने दगडफेक करून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करण्यास गेले असता एक कर्मचारी जखमी झाल्याची घटना १२ वाजेच्या सुमारास घटना घडली . दीपक कोळी असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून मनपा उपयुक्त श्री.संतोष वाहुळे यांच्या पथकाने आज कारवाई करताना काही फळ विक्रेत्यांकडून गोलाणी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून दिली असताना देखील ते बाहेर विक्री करीत असल्याचे समजल्याने आज दुपारी कारवाई करीत असताना काही लोकांच्या जमावाने कारवाईस गेलेल्या पथकावर दगडफेक केली . यात एक कर्मचारी जखमी झाला असून याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते .