जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून लागू झालेल्या या सुरक्षेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, यासाठी खबरदारी घेणे हा आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने डॉ. अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना राबविल्या असून, शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील आणि प्रचारादरम्यान त्यांची सतत देखरेख करतील. पोलिस प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रचारादरम्यान अनुचित घटना टाळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या निर्णयाचे आभार मानले आहेत.