जळगाव विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची कोणतीही परवानगी न घेता परस्पर सोशल माध्यमांवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या ५ उमेदवारांना दि.८ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया,सोशल मीडिया, बल्क मेसेजस / व्हाईस मेसेजस अशा माध्यमांवर प्रचाराच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची ( एमसीएमसी) परवानगी घेणे बंधनकारक आहे.
प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे असे असताना काही उमेदवारांच्या जाहिराती समाज माध्यमांवरून परस्पर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील ५ उमेदवाराना नोटीस बजावण्यात आली आहे.
उमेदवारांना सोशल माध्यमावर प्रचाराच्या जाहिराती प्रकाशित करावयाच्या असतील त्यांनी
जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची परवानगी घेऊनच जाहिराती प्रसारित कराव्यात असे आवाहन जिल्हा माध्यम कक्षा कडून करण्यात आले आहे.