डॉ. अनुज पाटील यांचे शहरातील डॉक्टरांना आश्वासन
जळगांव (प्रतिनिधी) :- शहरातील सर्व मान्यवर डॉक्टरांची बैठक आयएमए हॉल या ठिकाणी पार पडली. बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. पाटील यांनी निवडणूक लढण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व डॉक्टरांच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांचा समाधान करण्याकरता माझी उमेदवारी आहे असे आश्वासन दिले.
डॉ. अनुज पाटील असे म्हटले की, तुमच्या समस्या ऐकण्यासाठी, तुमच्या व्यथा समजून घेण्यासाठी मी, डॉ. अनुज पाटील, तुमच्यासमोर उभा आहे. आज डॉक्टरांवर संकटाचं सावट पसरलं आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णालयांवर होणारे हल्ले, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होणारा त्रास, महापालिका प्रशासनातील अग्निशमन दलातर्फे होणारा त्रास, शासनाच्या किचकट नियम व अटी यामुळे रुग्णालय चालवणे अतिशय जिकरीचे काम झाले आहे. परंतु, हे संकट आपण एकजुटीने पार करू शकतो, त्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे व आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे अशी आग्रही भूमिकाही डॉ. पाटील यांनी मांडली.
डॉक्टरांच्या समस्या विधानसभेमधे मांडण्यासाठी माझं वचन असेल आणि माझ्या प्रत्येक कृतीत तुमच्यासाठी दिलेला शब्द असेल. तुमच्या प्रत्येक व्यथा, तुमच्या समस्यांचा अंतिम निकाल लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एक नविन परिवर्तन आणण्याचा निर्धार मी केला आहे. या प्रसंगी आय एम ए चे अध्यक्ष डॉ. सुनील गाजरे, सचिव डॉ अनिता भोळे, डॉ.अनिल पाटील, डॉ विलास भोळे, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.सुनील नाहटा, डॉ.राजेश पाटील, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.सुदर्शन नवाल, डॉ.अजय सोनवणे, डॉ.अभिजित पाटील, डॉ.नरेंद्र भोळे, डॉ.लीना पाटील यांच्यासह डॉक्टर उपस्थित होते.