खान्देशातील प्रसिद्ध ‘भीमा-नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळा’वर शोककळा
नामदेव अभिमान बोरसे (वय ५५, रा. अंजाळे ता. यावल) असे मयत तमाशा कलावंताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. खांदेशातील प्रसिद्ध भीमा-नामा अंजाळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे गेल्या ४० वर्षापासून खांदेशामध्ये आपला नावलौकिक मिळवून आहे. (केसीएन)यातील भीमा म्हणजेच भीमराव बोरसे हे नामदेवराव बोरसे यांचे सख्खे भाऊ. त्यांचे ७ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर नामदेवराव बोरसे हे स्वतः आता तमाशा सादर करायचे. शुक्रवारी दि. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचा धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथे यात्रोत्सवात रात्री ८ वाजता तमाशाचा कार्यक्रम होता.
यात्रेमध्ये तमाशा ऐन रंगात आला असतानाच नामदेवराव बोरसे यांना त्रास होऊ लागला. अचानक छाती दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. (केसीएन)यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह खांदेशातील लोककला क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी आक्रोश केला. खान्देशातील मनोरंजन क्षेत्रातील कोहिनूर हिरा हरपला अशा प्रतिक्रिया लोकनाट्य कलावंतांनी व्यक्त केल्या आहेत.