चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गणपूर तांडा शिवारात सोमवारी दि. २८ ऑक्टोबर रात्री १० वाजता बिबट्याच्या हल्ल्यात राहुल नवनाथ मोरे (वय १४) हा मुलगा ठार झाला होता. हल्ला करणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.


वनविभागाने १० ट्रॅप कॅमेरे व तीन पिंजरे लावले होते. शुक्रवारी पिंपरखेड रस्त्यालगत लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. लवकरच त्याचे सुरक्षित वनपरिक्षेत्रात स्थलांतर करण्यात येणार आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्याकडून देण्यात आली.









