पारोळा-एरंडोल मतदारसंघाच्या विकासाचे घेतले ध्येय
पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा-एरंडोल मतदारसंघात औद्योगिक विकासासाठी व परिसराच्या सर्वांगिण विकासाचे ब्रीद घेऊन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी सांगितले.
मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून रॅली काढून हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी प्रसंगी नामांकन रॅलीकरीता मोठी गर्दी उसळणार असून महायुतीतर्फे जोरदार नियोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, जिल्ह्यातील सर्व आमदार, महायुतीचे सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
पारोळा-एरंडोल मतदारसंघात विकास करण्यासाठी सदोदित प्रयत्न करणाऱ्या आ. चिमणराव पाटील यांच्या पाऊलवाटेवर अजून पुढचे पाऊल टाकत सकारात्मक व शाश्वत विकासाची परंपरा अधिक समृध्द करण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन यावेळेस उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी केले. रॅलीसाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.