मनुष्य हे असंयमी असतात लवकर मोह, लोभाला बळी पडतात. इंद्रियांवर नियंत्रण न ठेवता असंयमाकडे आकर्षिक होतात. इंद्रियांचे विषय त्यांच्यासाठी अत्यंत प्रिय असतात. मनावर नियंत्रण नसल्याने ते असे करण्यास प्रेरित होतात. हेच आकर्षण आत्माच्या उन्नतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. संवरीत आणि असंवरीत होणे आपल्या हातात आहे. आपल्यात ती क्षमता आहे ती ओळखण्याची गरज आहे. इंद्रियांच्या विषयाला धरुन राहणे म्हणजे अज्ञान होय, कुठलेही इंद्रिय कधिच तृप्त होत नाही. तो एक खड्डा असून कधिच भरणार नाही यात आपण पडू नये याची काळजी घेतली पाहिजे. सामूहिक साधना हे बुद्धिला परावर्तित करण्याचे माध्यम आहे. जीवनभर संग्रहाची वृत्ती ठेवू नये. वैचारिक उदारता भावनिक दृष्टीने ठेवली पाहिजे. जे आपल्याला प्राप्त झाले आहे ते दुसऱ्यांना देण्यासाठी आहे. वडिलधाऱ्यांच्या ‘अपनी रोटी सो कौसपर’ या म्हणीप्रमाणे कार्य केले पाहिजे. या विषयामध्ये स्त्री ही घराची शोभा खऱ्या अर्थाने वाढवत असते. असे विचार आज धर्मसभेत शासनदीपक प. पु. सुमितमुनिजी महाराज यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.
आरंभी प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी विचार प्रकट केले, त्यात त्यांनी द्रव्य साधू आणि भाव साधू यांच्यातील फरक सांगत भाव साधू होण्यासाठी कोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे याचे विवेचन केले. संयमी आत्मा कर्मबंध तोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सांसारिक जीवनात प्रलोभनाला बळी न पडता मनातील सत्य ओळखा, त्यातील पुरूषार्थ बघा. कालचक्र कधिच थांबत नाही त्यामुळे सामुहिक साधना करा. धर्मोपदेशाने संसाराप्रती आपली दृष्टी बदलेल, असे विचार त्यांनी मांडले.