आपल्याला मिळालेले मानव जीवन हे दुर्लभ आहे. त्यामुळे आत्मा हिताची संधी आपल्याला प्राप्त झालेली असते परंतु आपण ते न करता दुसऱ्याच अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो, खरे तर कुणीच आत्मा हिताची संधी वाया घालायाला नको. आत्मा हिताचा ध्यास प्रत्येकाने घ्यायला हवा असे विचार शासन दीपक परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले.
वैदिक परंपरेत जीवनाचे चार पुरुषार्थ करायला सांगितलेले आहेत. त्यात धर्म, अर्थ,काम आणि मोक्ष यांचा समावेश आहे. यात एक तत्त्व नेहमीसाठी लक्षात ठेवले पाहिजे ते असे की, धर्म बाधित होईल अशा अर्थ व कामाची साधना मुळीच करू नका. एखादा युवक दिवसाला ५ सामायिक करत असेल तर त्याला वेड्यात काढले जाते. परंतु तो आत्मा हिताची कृती करत असतो. आपल्याला मिळालेला बहुमोल वेळ व संधी ही बाह्य भौतिक गोष्टीतच जात आहे. मख्खीचूस, कंजुष, उदार आणि दातार असे स्वभाव लक्षणे सांगून राजस्थान मधील भांडाशाह व सांडाशाह या भावंडांची माहिती सांगितली. परमपुज्य ऋजुप्रज्ञजी महाराज साहेबांनी प्रवचनात उत्तराध्ययन सूत्रच्या अध्यायांचा संक्षिप्त गोषवारा कथन साखळीत १३ व्या अध्यायाबाबत सांगितले. आठ प्रकारचे मद असतात ते कायम स्वरुपी नसतात त्यामुळे त्यांचा अहंकार बाळगणे चुकीचे आहे. व्यक्तीची पूजा त्याच्या गुणांवरून होते तीच व्यक्ती अवगुणी असेल तर ती अप्रिय असते. आपल्यात गुणांचा संचय करणे कधीही चांगले असे महाराज साहेबांनी अत्यंत प्रभावीपणे सांगितले.