जळगाव — गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयुएचएस), नाशिकच्या विद्यार्थी कल्याण विभागाद्वारे आयोजित मानसिक आरोग्य जनजागृती सत्रात सहभाग घेतला.
विद्यापीठाच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट सौ. मानसी हिरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या या सत्रात आरोग्य विज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा ताण आणि त्यावर मात करण्यासाठी मानसिक आरोग्य कसे जपावे याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ताणाचा विचार करून, विद्यापीठाने झूम ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी टीप्स देतांना ज्यामध्ये ताण प्रभावीपणे कसा हाताळावा यावर भर देण्यात आला आणि मानसिक स्थिरतेसाठी उपयुक्त साधने दिली गेली. महाविद्यालयाच्या ९५ विद्यार्थ्यांनी या सत्रात सहभाग घेतला, ज्यामध्ये ताण प्रभावीपणे कसा हाताळावा यावर भर देण्यात आला आणि मानसिक स्थिरतेसाठी उपयुक्त साधने दिली गेली.