संत-महात्मा, मुनीजन आपल्या आयुष्यातून शरिररुपाने निघून जातात. मात्र त्यांचे विचार, उपदेश हे कायम चिरकाल शाश्वत असतात. गुुरु व शिष्यामधील नाते हे भावनिकतेतून जुळलेले असते. आंतरमनातून एकमेकांविषयी समजून घेतले जाते. समता, समर्पण हा मनोभाव खूप मोलाचा आहे. आपल्या सिद्धांतानुसार सुयोग्य असलेल्या गुरूंच्या चरणी आपल्या ईच्छा, आकांक्षा प्रस्तुत करा, आपल्याला निश्चीतच जीवन सुखद करण्याचा मार्ग सापडतो. आचार्य श्री रामेशमुनीजी म.सा. व आचार्य श्री नानालालजी म.सा. यांचे उदाहरण देत दोघंही संतांच्या समता आणि घेतलेला संकल्प पूर्ण करण्याची क्षमता, समर्पणभाव या गुणांची आपल्या जीवन आचरणात आणावे, असा सल्ला आज धर्मसभेत शासनदीपक प.पु. सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी श्रावक-श्राविकांना दिला.
आरंभी प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म.सा. यांनी विचार प्रकट केले, त्यात त्यांनी साधक व साधू यांच्या कष्टांविषयी भाष्य केले. प्रत्येकाला कष्ट आहेत. कष्टाशिवाय काहिहि नाही. आयुष्यात प्रत्येकाचे प्रश्न, कष्ट वेगवेगळे असले तरी सहनशील झाले पाहिजे. प्रयत्नशील होऊन क्षमाशील बनता आले पाहिजे. साधू जीवन असो की, ग्रहस्थी जीवन असो प्रत्येकाला प्रश्न येतात त्यांना नाकारु शकत नाही किंवा थांबवू शकत नाही, मात्र ते संपविता येतात त्यासाठी बावीस प्रकारचे परिचय आहेत. चांगल्या साधकाचे लक्षण या त्यांच्या आचरणातून दिसते. कुणाच्या मनाला सुद्धा दुषित करुन नये असे विचार त्यांनी मांडले.