जळगाव तालुक्यातील शिरसोली-नायगाव शिवारात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : विशेष मोहीमेंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी मिळून तालुक्यातील शिरसोली गावाच्या नायगाव शिवारात अवैधरीत्या सुरु असलेल्या गावठी दारुच्या हातभट्टया एकुण ७ ठिकाणी धाड टाकल्या. ११ लाख ४६० रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे.
पोलीस पथकाने गावठी हात भट्टी, कच्चे पक्के रसायन हे नष्ट करण्यात आले आहे. सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचेसह पोउनी दिपक जगदाळे, सफौ अधिकार पाटील, पोना प्रदीप पाटील, योगेश बारी, नितीन ठाकुर, शुध्दोधन ढवळे, गणेश ठाकरे, तुषार गिरासे, नाना तायडे, किरण पाटील, मंदार पाटील, सिध्देश्वर डापकर, रतन गिते, चंद्रकांत पाटील अशांनी मिळून केलेली आहे.