अमळनेर तालुक्यातील पिंपळे रोडवरील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील पिंपळे रोडवरील विठ्ठलनगर भागातील तरुणाने दिनांक १२ रोजी पहाटे साडे बारा ते एक वाजेच्या दरम्यान पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
विरभान पुंडलिक पाटील (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. विठ्ठल नगर भागामध्ये शनिवारी मध्यरात्री त्याने राहत्या घरी पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अंगललां गळफास लावून घेत आत्महत्या केली.
कुटुंबीयांना समजताच शेजारी नागरिकांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.