• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भरघोस उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे : तज्ज्ञांचा सूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भुसावळ
0
भरघोस उत्पादनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे : तज्ज्ञांचा सूर

भुसावळ तालुक्यात साकरी येथे कांदा, टोमॅटो पीक परिसंवाद

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील काळी कसदार जमीन, पाण्याची उपलब्धता आणि कष्टाळू शेतकरी आहेत. रावेर व भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांची तुलना केली असता रावेर तालुक्याचा शेतकरी केळी, कापूस, कांदा, सोयाबीन, टोमॅटो इत्यादीचे सर्वाधिक उत्पादन घेतो. असे का याचे चिंतन केले असता आपण उच्च कृषि तंत्रज्ञान आणि आधुनिक सिंचन तंत्राचा म्हणावा तसा उपयोग करत नाहीत. भरघोस उत्पादनासाठी ठिबक सिंचन व उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापकीय डी.एम. बऱ्हाटे यांनी केले. भुसावळ तालुक्यातील साकरी येथील राधा-कृष्ण मंदिराच्या आवारात ०९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेत्रा अॅग्रो सर्व्हिसेस आणि जैन इरिगेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कांदा, टोमॅटो पीक परिसंवाद’ कार्यक्रम घेण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, साकरी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र चोपडे, करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसर्डा, कृषितज्ज्ञ श्रीराम पाटील आणि व्ही.आर. सोळंकी आणि नेत्रा अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक उमाकांत भारंबे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजन करून या परिसंवादास सुरूवात झाली. जैन इरिगेशनचे कृषीतज्ज्ञ श्रीराम पाटील यांनी करार शेती, हमीभाव योजना याबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात पांढरा कांदा करार शेती यशस्वी करून दाखविणारी जैन इरिगेशन कंपनी आहे. आता कांद्या बरोबर टोमॅटो, हळद या पिकांसाठी देखील करार शेती उपक्रमात शेतकरी सहभागी होऊ शकतात व आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करू शकतात. कृषितज्ज्ञ व्ही. आर. सोळंकी यांनी पिकांवरी कीड व रोग, खत व्यवस्थापन याबाबतच्या तांत्रिक गोष्टींवर मार्गदर्शन केले.

करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी इतर पिकांच्या तुलनेत कांदा, टोमॅटो पीक घेणे कसे फायद्याचे याबाबत सोदाहरण सांगितले. या करार शेती अंतर्गत साकरी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जैन इरिगेशन योग्य ते मार्गदर्शन व लागणारे तंत्र बांधापर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांचा हा वारसा पुढील पिढी चालवित आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कंपनीचे सर्व संचालक व सहकारी कटीबद्ध आहेत.पारंपरिक शेतीत न अडकता शेतकऱ्यांनी स्मार्ट शेती करावी असे आवाहन गौतम देसर्डा यांनी केले. यावेळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विभागाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक ए.डी. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जैन इरिगेशनचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी केले.


 

Tags: #jalgaonhttps://kesariraj.com/jainirrigetion-3/
Previous Post

माजलगाव येथील चिमुरडीवरील अत्याचाराचा निषेध ; कारवाईची मागणी

Next Post

गर्भलिंगनिदान होतेय ? माहिती द्या अन् मिळवा १ लाख रुपये..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गर्भलिंगनिदान होतेय ? माहिती द्या अन् मिळवा १ लाख रुपये..!

गर्भलिंगनिदान होतेय ? माहिती द्या अन् मिळवा १ लाख रुपये..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon