अमळनेर शहरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :– शहरातील ढेकू रोड परिसरातील सद्गुरू नगर, दीपक नगर, योगेश्वर नगर तसेच गुलमोहर कॉलनी येथून घरासमोर लावलेल्या ४ दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
फिर्यादी अंकित गुर्जर (रा. देवास) हे खाजगी नोकरी निमित्त सद्गुरू नगर ढेकू रोड येथे राहत असून त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक एमपी ४१ झेडई ८०८३) ही २ रोजी रात्री घरासमोर लावली होती. मात्र ३ रोजी सकाळी उठून पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही. ढेकू रोड परिसरात शोध घेतला असता दीपक नगर येथील हर्षल सुरेश पाटील यांची होंडा सिबी शाईन (क्र. एमएच ०५ ईई ३२१६) ही दुचाकी सुद्धा चोरीला गेल्याची माहिती मिळाली. दोन्ही दुचाकींचा शोध घेतला मात्र त्या मिळून न आल्याने अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून हेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहेत.
तर दुसऱ्या फिर्यादीनुसार ढेकू रोड परिसरातील योगेश्वर कॉलनीत राहणारे सुनील आनंदा पाटील यांची होंडा शाईन दुचाकी (क्र. एमएच १९ डीएन ०२८७) ही २ रोजी रात्री घरासमोर लावली होती. मात्र ३ रोजी सकाळी दुचाकी दिसून न आल्याने परिसरात शोध घेताना गुलमोहर कॉलनीत राहणारे जितेंद्र काशिनाथ मोरे यांची होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्र. एमएच १९ इबी २१४४) देखील चोरीस गेल्याचे कळाले. दोन्ही दुचाकींचा शोध न लागल्याने त्यांनी तक्रार दिली. अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संतोष पवार हे करीत आहेत.