जळगाव ग्रामीण मतदार संघात तिरंगी लढत ; मशाल घरोघरी पोहचविणार – लकी अण्णा टेलर
जळगाव (प्रतिनिधी )पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे दोघे दिग्गज नेते जळगाव ग्रामीण मतदार संघातून लढणार असल्याचे निश्चित मानले जात असून या दोघा गुलाबरावांमध्ये काट्याची टक्कर होणार यात कुणाचेही दुमत नाही. मात्र या निवडणुकीत कुणाची सरशी होईल किंबहुना ‘लकी ‘ कोण ठरणार याची चर्चा आता रंगू लागली आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत . त्यांच्यासोबत त्यांचे दिग्गज प्रतिस्पर्धी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार असल्याने हि लढत रंगतदार ठरणार आहे. मात्र जळगाव ग्रामीण भागात सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये चर्चेचा चेहरा असणारे लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील हे देखील या दोन दिग्गज गुलाबरावांना तुल्यबळ लढत देतील यात शंका नाही .
नुकतेच शिवसेना उद्धव ठाकरे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या सोबत लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.या चर्च खासदार संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी मशालीचे चिन्ह घराघरात पोहचवीण्याचा निर्धार व्यक्त केला . आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून लकी अण्णा टेलर यांची शिवसेना उद्धव ठाकरे गटांकडून उमेदवारी निश्चित मानली जात असून यासाठी लकी अण्णा टेलर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे . मशाल चिन्ह घरोघरी पोहचविण्यासाठी प्रवासी रिक्षांच्या मागे बॅनर लावून वातावरण निर्मिती केली जात आहे. जळगाव ग्रामीण भागात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लकी अण्णा टेलर हे भावी आमदार म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. लकी अण्णा टेलर यांनी विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या , प्रश्न , अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार म्हणून निवडून दिल्यास जळगाव ग्रामीण मतदार संघात विकासाची गंगा आणणार असल्याचा मनोदय लकी अण्णा टेलर यांनी बोलून दाखविला.
जळगाव ग्रामीण मतदार संघाचा हव्या त्या प्रमाणात विकास झालेला नसून विकासाचा हा अनुशेष आपण निवडून आल्यानन्तर नक्कीच भरून काढणार असल्याचे लकी अण्णा टेलर यांनी बोलतांना सांगितले . अर्ध्या रात्री मदतीला धावून जाणारे लकी अण्णा ओळखले जातात. त्यांना जळगाव ग्रामीण मतदार संघात मानणारा एक मोठा वर्ग आहे. शांत,संयमी दयाळू , दातृत्व असणारे व्यकितमत्व म्हणून लकी अण्णा यांनी आपली अमीट छाप उमटवली आहे. त्यामुळे दोन गुलाबरावांमध्ये होणाऱ्या या लढतीमध्ये लकी अण्णा उमेदवारी करणार असल्याने जळगाव ग्रामीण मतदार संघात तिरंगी लढतीने चुरस वाढणार आहे.