चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनची मालापूर येथे कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : येथील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या मालापूर शिवारातील शेतात गांजाची लागवड केली असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी छापा मारून ७५० किलोग्रॅमचा गांजा म्हणजे ४५ लाखांचा गांजा जप्त केला आहे. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला असून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मालापूर शिवारात नाबार्डच्या कंपार्टमेंट २११ च्या असलेल्या शेतात गांजाची लागवड केलेली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. दिनांक ६ रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व त्यांच्या पथकाने तपासणी केल्यावर सदरील शेतात गांजाची शेती करत असल्याचे दिसले. (केसीएन)या कारवाईत ७५० किलोग्रॅमचे ओला गांजा आढळला. त्याची किंमत जवळपास ४५ लाख रुपयांच्या जवळ आहे. गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
संशयित आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा (रा. डॅडीया पाडा ह. मु. चोपडा) यांच्या शेतात गांजाची शेती आढळून आली. दरम्यान, पोलीस आल्याचे समजताच आरोपी हा फरार होण्यात यशस्वी झाला.(केसीएन)याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी रुमाल्या चेचऱ्या पावरा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी कारवाई केली. पुढील तपास उप पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे व पो.हे.कॉ. गणेश मधुकर पाटील करीत आहे.