जळगाव (प्रतिनिधी) : एसएसबीटी संस्थेच्या फार्मसी काॅलेज येथे नवरात्री उत्सवानिमित्त आयोजित दांडीया नाईट कार्यक्रमास माजी नगरसेवक अश्विन सोनवणे यांनी भेट दिली. प्रिन्सीपल डॉ. अमोल लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरस्वती देवीचे पुजन करण्यात आले.

अश्विन सोनवणे यांनी, प्रसंगी तरुण विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करुन तरुण पिढीस प्रोत्साहित केले. या समयी सर्व शिक्षक वर्ग हजर होते. या कार्यक्रमासाठी दर्शन बोरसे, देवेंद्र भावे, शुभम चौधरी, मनिष पाटील, भावेश पजई यांनी परीश्रम घेतले.









