जळगाव ग्रामीण मतदारसंघात केवळ “धनुष्यबाण”चा बोलबाला
जळगाव (विशेष वृतांत) :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात देखील तरुणांसह नागरिकांचा ओढा हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. विकासकामांचा धडाका, उत्तम जनसंपर्क, सुख-दुःखात धावून जाणे यामुळे गुलाबराव पाटील मतदारांचे लाडके झाले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश देखील वाढले आहे. राज्यातील सर्वोत्तम पालकमंत्री असा नावलौकिक गुलाबराव पाटील यांनी मिळविला आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडसाद सर्वत्र वाजत आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघात नेहमीप्रमाणे गुलाबराव पाटील यांनी प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा मतदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंवसेना शिंदे गटातर्फे धनुष्यबाण या चिन्हावर गुलाबराव पाटील यांनी तयारी सुरु केली आहे.(केपीएन) पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाल्यावर गुलाबराव पाटील जोमाने कामाला लागणार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे काम गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात करण्यासाठी अनेक इच्छुक तरुणांनी गेल्या आठवड्याभरात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यासह काही नागरिक, महिलांनी देखील पक्षाच्या माध्यमातून जनसेवा करण्यासाठी व गुलाबराव पाटलांना विधानसभेत पुन्हा पाठविण्यासाठी पक्षप्रवेश केला आहे. जळगाव ग्रामीण मधील अनेक गावांत आज चैतन्यमयी वातावरण असून शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव निवडून येण्यासाठी कार्यकर्ते प्रचार करीत आहेत. या प्रचाराला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. (केपीएन)त्यामुळे गुलाबराव पाटील पुन्हा निवडून येतील असे वातावरण आहे. अनेक राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे की, यंदा गुलाबराव पाटील यांच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्यामुळे त्यांचा विजय लाखोंच्या मताधिक्याने राहील. त्यामुळे गुलाबराव पाटील पुन्हा विधानसभेत जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील.