रावेर तालुक्यात महसूल पथकाची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : विनापरवाना बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर रावेर महसूल पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. यात आयशर व तीन ट्रॅक्टर ही चार वाहने जप्त केली आहेत.
रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी खूप वाढल्या होत्या. काल रात्री खिरोदा प्र. यावलमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन टाटा ४०७ आयशर क्रमांक (एमएच १९ एस ८५२१), ट्रॅक्टर ट्रॉली एमएच २९ व्ही ६९४, आणि विना पासिंग ट्रॅक्टर ट्रॉली कर्जोत आहीरवाडी रस्त्यावर जप्त करण्यात आले. एकाच दिवशी चार वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
ही कारवाई तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी खिरोदा प्र. यावल अमोल चौधरी, मंडळ अधिकारी रावेर यासिन तडवी, मंडळ अधिकारी के-हाळा अनंत खवले, मंडळ अधिकारी खानापुर विठोबा पाटील, पाल मंडळ अधिकारी निलेश धांडे, तलाठी रविंद्र शिंगने, समीर तडवी, निलेश चौधरी, निलेश पाटील, स्वप्नील परदेशी, समीर तडवी, सुधिर खैरे, कोतवाल गणेश चौधरी, आणि सचिन राठोड यांच्या महसूल पथकाने केली.