जळगाव शहर वाहतूक शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : शहर वाहतूक शाखेने शहरातील वाहनांवर केलेला दंड वसूल करण्यासाठी ६५० नोटीस बजावून त्यापैकी ७ दिवसांमध्ये १५ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहर वाहतूक शाखेने नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड टाकलेला आहे.
मात्र नागरिकांनी वाहनावरील दंड न भरल्यामुळे वाहतूक शाखेने वाहनधारकांना नोटिसा बजाविल्या होत्या. जळगाव शहरात वाहतूक शाखेने ६५०० नोटीस वाहन धारकांना दिल्या होत्या. त्यापैकी दि. २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत म्हणजे ७ दिवसांमध्ये २ हजार ५१० वाहनधारकांनी दंड भरला. ७ दिवसांमध्ये १५ लाख ३९ हजार ६५० रुपयांचा दंड शहर वाहतूक शाखेने वसूल केला. येत्या काळात शहर वाहतूक शाखेने गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात थकीत असलेला दंड व वाहनांवर एक पेक्षा जास्त असलेल्या दंड ज्या वाहनधारकांनी भरलेला नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. जवळपास १ लाख वाहन धारकांना नोटीस देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली आहे.