जिल्हा बुद्धिबळ संघटना, जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ९ वर्षाआतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन दि. २२ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. यातून पहिले दोन मुली व दोन मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली.
स्पर्धेत एकूण सहा फेऱ्या घेण्यात आल्या. स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न झाल्या असून जिल्ह्यातील एकूण २४ खेळाडूंनी सहभाग घेतला. सोलापूर येथे दि.
२७ ते २९ सप्टेंबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली. यात मुलांमध्ये गौरव जितेंद्र बोरसे, द्रोणा जांबले यांची तर मुलींमध्ये शौर्या पाटील, भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड झाली.
विशेष उत्तेजनार्थ मुलींमध्ये ईश्वरी कोळी, निहिरा पालवे तर मुलांमध्ये रुजूल सरोदे, युवान तापडिया, आर्यन अग्रवाल, वीर आहुजा, ओजस तन्नीवार,कबीर दळवी, मृगान पाटील, योगेश काकडे, प्रचा हनी यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे, आकाश धनगर, नथू सोमवंशी, स्वप्निल निकम यांनी काम केले. पारितोषिक वितरण जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया ज्येष्ठ खेळाडू व पंच नथू सोमवंशी, प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना बक्षिसे देण्यात आली. सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन व पदाधिकारी यांनी केले.